सिद्धेश्वर मंदिर, बारामती
बारामतीचे सिद्धेश्वर मंदिर बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिरास नुकतीच ८४० वर्षे पूर्ण झाली. शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजापासून ते कविवर्य मोरोपंतांच्या पर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे.
ई.स. पूर्व ११३७ मध्ये राजा रामदेवराव यादव यांनी या मंदिराचया उभारणीचे काम हाती घेतले. चाळीस वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे मंदिर साकारले अखंड लिंग व अखंड दगडात कोरलेला सुंदर नंदी हे या मंदिराचे विशेष होय. नंदीचे सर्व दागिने सुद्धा दगडातच कोरलेले आहेत. समोरून नंदीकडे पहिले तर त्याचा एक कान तुमच एकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यात पोहचवण्याचे काम तो करतो असा भास होतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एका पाण्याची टाकीची सोय होती. गुप्त लिंग आता तेथून काढून टाकले आहे . मात्र त्या काळातली वास्तू कला किती आधुनिक होती हे मंदिराकडे पाहिल्यावर जाणवते.
ओरंगजेबच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराजाची स्थापना केल्या नंतर त्याच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्त केली. तेव्हापासून दाते कुटुंब आजतागायत सिद्धेश्वर मंदिराची दैनदिन व्यवस्था पाहतात. सन १७२३ मध्ये बालाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक संनद लिहून ठेवली होती जी आजही उपलब्ध आहे त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदिरात नेहमी येत असत त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली. संत तुकारामाचे वास्तव येथे होते. या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामी या मंदिरात आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पुर्वी तुकारामाच्या पालखीचे वास्तव याच मंदिरात असे.