Jump to content

सिद्धमंगल स्तोत्र

श्रीपाद वल्लभ महाराजांची मूर्ती

सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद वल्लभ महाराजांच्या उपासनेत वापरले जाणारे स्तोत्र आहे. या स्तोत्राची रचना श्रीपाद वल्लभ महाराजांचे आजोबा, (त्यांच्या आईचे वडील) बापनाचार्युलु यांनी रचलेले आहे. हे स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे असे मानले जाते.[]

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात सतराव्या अध्यायात हे स्तोत्र येते. या ग्रंथाचे ग्रंथकार शंकर भट म्हणतात, श्री बापनाचार्युलुंना श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले.[]

श्रीपाद वल्लभ

श्रीपाद श्रीवल्लभ किंवा श्रीपाद वल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार आहे असे मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा जन्म आंध्रप्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिठापुरम नावाच्या एका छोट्या गावात झाला होता.[][] जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ महाराज लहान होते तेव्हा एकदा ते आपल्या मातामह (आजोबा) सोबत, म्हणजे बापनाचार्युलु सोबत खेळत होते तेव्हा बापनाचार्युलुंंनी लाडाने त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि पायांचे चुंबन घेतले. त्या वेळी लहानग्या श्रीपाद महाराजांनी बापनाचार्युलुंंना दत्तरूपात दर्शन दिले. त्यामुळे बापनाचार्युलुंंना सिद्धमंगल स्तोत्राचे ज्ञान प्राप्त झाले आणि नंतर त्यांनी हे स्तोत्र रचले.[][] श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमृतम ग्रंथाच्या सतराव्या अध्यायाच्या शेवटी सिद्धमंगल स्तोत्र येते.

सिद्धमंगल स्तोत्र

श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥१॥

अर्थ: श्रीलक्ष्मी आणि सर्व वैभवयुक्त विष्णूरूपी भगवान श्री दत्तात्रेयांनी अप्पललक्ष्मी नरसिंहराजा कडे पुत्र रूपात जन्म घेतला. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

श्री विद्याधारी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥२॥

अर्थ: श्रीपाद महाराजांच्या बहिणी विद्याधरी, राधा आणि सुरेखा या खूप भाग्यवान आहेत की त्या प्रत्यक्ष श्रीपाद महाराजांना राखी बांधून आपले रक्षण करून घेतात. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥३॥

अर्थ: सुमती महाराणी (सुमती देवीच्या नावामागे महाराणी हा शब्द लाडाने वापरला जात होता)च्या वात्सल्य रुपी अमृताने ज्यांचे पालन पोषण आणि संवर्धन झाले, अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥४॥

अर्थ: सत्यऋषी रूपातील नातू श्रीपाद महाराज बापनाचार्यलुना लाभले हे त्यांचे अहोभाग्य आहे. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

सवितृ काठकचयन पुण्यफला भारद्वाजऋषी गोत्र संभवा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥५॥

अर्थ: प्राचीन काळी श्रीपाद महाराजांचे पूर्वज भारद्वाजऋषींंनी प्रत्यक्ष देवता त्यांच्या घराण्यात जन्माला याव्यात यासाठी संकल्पयुक्त सवितृ काठक नावाचा यज्ञ केला होता. अशा महान यज्ञाचे फळ भारद्वाजऋषीच्या घराण्यात जन्माला आले, अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥६॥

अर्थ: जेव्हा श्रीपाद महाराज माधुकरी मागत फिरायचे तेव्हा ते दौ चौपाती देव लक्ष्मी अशी साद घालायचे. सामान्य माणसाला ते दोन चपात्या मागताहेत असेच वाटे. परंतु दो (२) चौ (४) पती (९) लक्ष्मी (८) अशी कूट संख्या ते उच्चारायचे. २४९८ ही कूट संख्या मुळात गायत्री देवीची खुण आहे. अशा प्रकारे ते गायत्री मातेचे अप्रत्यक्ष संरक्षण आपल्या भक्तांना मिळवून देत. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

पुण्यरुपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥७॥

अर्थ: राजमांबा मातेने श्रीपाद महाराजांच्या आई सुमती महाराणी यांना जन्म दिला. ज्यायोगे श्रीपाद महाराज त्यांच्या पुढच्या पिढीत जन्माला आले. आणि अशा प्रकारे राजमांबा यांनी जी उत्तम संतान प्रदान केली त्यामुळे त्यांचे व बापनाचार्यलुचे भाग्य फळाला आले. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥८॥

अर्थ: सुमती महाराणी आणि अप्पललक्ष्मी नरहरीराज यांच्या पोटी प्रत्यक्ष दत्त महाराज जन्माला आले. हे त्यांचे आणि सामान्य दिन दुःखी जणांचे अहोभाग्य आहे. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

पीठिकापुर नित्यविहारा मधुमतीदत्ता मंगलरूपा ।

जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंङ श्री विजयीभव ॥९॥

अर्थ: मधुमती योग्यशक्तीने प्रत्यक्ष दत्त महाराज श्रीपाद रूपात जन्माला येण्यापूर्वी, जन्माला आल्यावर आणि भविष्यात नंतर सुद्धा गुप्तरूपात पिठापुरला नित्य विहार करतात. यामुळे पिठापुर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. काय हे अहोभाग्य सामान्य माणसाचे. अशा श्रीदत्ताचा सदैव विजय असो, दशदिशा आणि सर्व खंडात (संपूर्ण ब्रह्मांडात) त्यांची कीर्ती पसरो.

॥ श्रीपादराजम शरणम प्रपद्ये ॥

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b "श्रीपाद श्रीवल्लभ". 2021-03-07 रोजी पाहिले.
  2. ^ a b c जोशी निटूरकर, हरिभाऊ (2012). श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान. p. 142.
  3. ^ "About SripadaSrivallabha Mahasamstanam Pithapuram" (english भाषेत). 2021-03-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)