सिटी ऑफ लंडन
सिटी ऑफ लंडन City of London | |||
युनायटेड किंग्डममधील शहर | |||
| |||
ग्रेटर लंडनमधील स्थान | |||
देश | युनायटेड किंग्डम | ||
राज्य | इंग्लंड | ||
काउंटी | ग्रेटर लंडन | ||
क्षेत्रफळ | २.९० चौ. किमी (१.१२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ७,९०० | ||
http://www.cityoflondon.gov.uk |
सिटी ऑफ लंडन हा इंग्लंडातील ग्रेटर लंडन शहराचा भाग आहे. मध्ययुगीन काळातील लंडन म्हणजेच आजचे सिटी ऑफ लंडन होय. आजचे ग्रेटर लंडन हे सिटी ऑफ लंडन व ३२ इतर लंडन बरो मिळून बनले आहे.
सिटी ऑफ लंडन हा आजच्या लंडन शहराचा ऐतिहासिक गाभा आहे. या भागाभोवती आज दिसत असलेले उर्वरीत ग्रेटर लंडन उदयास आले. या शहराच्या चतुःसीमा मध्ययुगीन काळापासून फारशा बदललेल्या नाहीत. मध्य लंडनाचा लक्षणीय भाग असलेल्या या शहराचे क्षेत्रफळ जेमतेम १ वर्ग मैलाइतके आहे. पारंपरिक संकेतानुसार लंडनाच्या नकाशांत या भूभागाचा उल्लेख "सिटी" असा केला जातो. तसेच, या भागाचा संदर्भ देताना 'सिटी' अथवा 'स्क्वेअर माइल' या संज्ञा वापरल्या जातात.
या शहराचे स्थानिक प्रशासन सिटी ऑफ लंडन महानगरपालिकेच्या हाती असून ब्रिटनातील इतर स्थानिक प्रशासकीय संस्थांपेक्षा वेगळे अधिकार या महानगरपालिकेला आहेत. तसेच, सिटी ऑफ लंडनाच्या हद्दीबाहेरच्या काही बाबींची जबाबदारी आणि काही अधिकार हे या महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. सिटी ऑफ लंडन महानगरपालिकेचा मुख्य लॉर्ड मेयर असून हे पद मेयर ऑफ लंडन या पदाहून निराळे व स्वतंत्र आहे.
सध्याचे सिटी ऑफ लंडन हे एक मोठे व्यापार व आर्थिक उलाढालींचे केंद्र आहे.
या शहरातील रहिवाशांची संख्या १०००० च्या आसपास असून दररोज येथे साधारणत: ३३०,०००लोक उद्योगधंद्यानिमित्त येतात. सिटी ऑफ लंडनाचा पश्चिमेकडील प्रमुख भाग म्हणजे टेम्पल लेन व चॅन्सरी लेन येथे असलेल्या वकिलीव्यवसायाशी निगडित 'इन्स ऑफ कोर्ट' होत. यांपैकी इनर टेंपल व मिडल टेंपल या सिटी ऑफ लंडनाच्या कक्षेत येतात.