Jump to content

सिक्कीमचे राज्य

सिक्कीमचे राज्य


१६४२ - १९७५
राजेगंगटोक
भाषा तिबेटी, सिक्कीमी, लेपचा, नेपाळी
क्षेत्रफळ वर्ग किमी


सिक्कीमचे राज्य (शास्त्रीय तिबेटी आणि सिक्कीमी : འབྲས་ལྗོངས།), पूर्वीचे द्रेमोशोङ (शास्त्रीय तिबेटी आणि सिक्कीमी : འབྲས་མོ་གཤོངས།, १८०० पर्यंत अधिकृत नाव), पूर्व हिमालयात १६४२ ते १६ मे १९७५ पर्यंत वंशपरंपरागत राजसत्ता होती. यावर नामग्याल घराण्याचे चोग्याल राज्य करीत होते.

इतिहास

नेपाळचे वर्चस्व

१८ व्या शतकाच्या मध्य काळात, नेपाळने (त्यावेळचे गोरखा राज्य) सिक्कीमवर स्वारी केले आणि सिक्कीममध्ये ४० पेक्षा अधिक वर्षे गोरखा राज्य होते. १७७५ ते १८१५ दरम्यान, जवळजवळ १,८०,०० वांशिक नेपाळी पूर्व आणि मध्य नेपाळहून सिक्कीममध्ये स्थानांतरित झाले. भारताच्या ब्रिटिश वसाहतनंतर, सिक्कीमने ब्रिटिश भारताशी संबंध ठेवला, कारण त्यांचा एक समान शत्रू - नेपाळ होता. संतप्त नेपाळ्यांनी सूडबुद्धीने सिक्कीमवर हल्ला केला आणि तराईसह बहुतांश प्रदेश पादाक्रांत केला. या घटनेने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी १८१४ मध्ये नेपाळवर आक्रमण करण्यास प्रवृत्त झाली, परिणामी इंग्रज-नेपाळ युद्ध झाले. ब्रिटन आणि नेपाळ यांच्यात सुगौली करारामुळे आणि सिक्कीम आणि ब्रिटिश भारत यांच्यातील तितालिया करारामुळे नेपाळला प्रादेशिक सवलती मिळाली ज्यामुळे सिक्कीमला ब्रिटिश भारताला अभयारपीत करण्यात आले.[]

ब्रिटिश आणि भारतीय रक्षितराज्य

१८६१ च्या टुमलोंग कराराअंतर्गत सिक्कीम हा ब्रिटिश रक्षितराज्य बनले, मग १९५० मध्ये ते भारतीय रक्षितराज्य झाले.[]

भारतात दाखल

१९७५ मध्ये नेपाळी हिंदूंवर भेदभावाच्या आरोपामुळे चोग्याल यांच्या विरोधात नाराजी पसरली.[][] त्यांच्या चिथावणीमुळे भारतीय लष्कराचे कर्मचारी गंगटोकमध्ये गेले. द स्टेट्समॅनच्या सुनंदा के. दत्ता-रे यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिल १९७५ मध्ये सैन्याने राजवाड्यातील पहारेकऱ्यांना मारले.[]

राजवाड्याच्या निःशस्त्रीकरणानंतर राजसत्तेवर सार्वमत घेण्यात आले, ज्यात सिक्कीमच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात राजसत्तेचे उच्चाटन करण्यासाठी मत दिले आणि काझी लेंदुप दोरजी यांच्या नेतृत्वात सिक्कीमच्या नवीन संसदेने सिक्कीमला भारतीय राज्य होण्यासाठी विधेयक प्रस्तावित केले. भारत सरकारने तातडीने हा प्रस्ताव स्वीकारला[][].

संस्कृती आणि धर्म

संस्कृती आणि धर्मात, सिक्कीमचा तिबेटशी आणि भूतानशी जवळचा संबंध होता आणि सिक्कीमचा पहिला राजा तिबेटहून स्थलांतरित झाला. सिक्कीमची भूतानसोबत सीमा देखील आहे. येथे, प्रामुख्याने पूर्व आणि मध्य नेपाळमधील नेपाळी लोकांच्या मोठ्या सांख्येची उपस्थिती देखील नेपाळशी सांस्कृतिक संबंध निर्माण करते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

 

  1. ^ "History of Nepal: A Sovereign Kingdom". Official website of Nepal Army. 2011-06-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ a b c "Indian hegemonism drags Himalayan kingdom into oblivion". Nikkei Asian Review. Nikkei. 21 February 2016. 3 April 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 July 2018 रोजी पाहिले.
  3. ^ Larmer, Brook (March 2008). "Bhutan's Enlightened Experiment". National Geographic. Bhutan. (print version).
  4. ^ "25 years after Sikkim". Nepali Times (#35). 23–29 March 2001.
  5. ^ Sethi, Sunil (18 February 2015). "Treaties: Annexation of Sikkim" (2). India Today. India Today. 4 December 2016 रोजी पाहिले.

कामे उद्धृत

  • Constructing Sikkimese National Identity in the 1960s and 1970s, 2003

पुढील वाचन

  • Duff, Andrew (2015). Sikkim: Requiem for a Himalayan Kingdom. Edinburgh: Birlinn. ISBN 978-0-85790-245-0.
  • The State in the Colonial Periphery: A Study on Sikkims Relation with Great Britain
  • India and Sikkim: Redefining the Relationship
  • Nepal – Strategy for Survival
  • Himalayan triangle: a historical survey of British India's relations with Tibet, Sikkim, and Bhutan, 1765-1950
  • Discovery of North-East India: Geography, History, Culture, Religion, Politics, Sociology, Science, Education and Economy. Sikkim. Volume ten

बाह्य दुवे