सिंधु पाणी वाटप करार
सिंधु पाणी वाटप करार : हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत झालेला नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भातला करार आहे. सिंधु नदी आणि तिच्या खोऱ्यातील इतर काही नद्यांच्या पाणीवाटपासंदर्भात जागतिक बँकेच्या पुढाकाराने दोन देशांत करार करण्यात आला. जवळपास दहा वर्षे वाटाघाटी झाल्यानंतर उभय देशांनी पाकिस्तानात कराची येथे १९ सप्टेंबर १९६०ला स्वाक्षऱ्या केल्या[१]. भारतातर्फे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तर पाकिस्तानतर्फे अध्यक्ष अयुब खान यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
या करारातील तरतुदींनुसार सिंधु, चिनाब आणि झेलम या पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी पाकिस्तानला वापरता येईल तर रावी, बियास व सतलज या पूर्वेकडच्या नद्यांच्या पाण्याबाबत भारताला सर्व अधिकार असतील. याशिवाय पश्चिमेकडच्या नद्यांतून भारताला एकूण पाण्यापैकी २० टक्के पाणी उपलब्ध आहे.[२]
संदर्भ
- ^ खरे, विनीत (2016-09-23). "भारत-पाक के बीच सिंधु जल समझौते की कहानी" (इंग्रजी भाषेत). 2019-02-21 रोजी पाहिले.
- ^ "सिंधु पाणी वाटप करार : एक राजनैतिक अस्त्र!". Maharashtra Times. 2019-02-21 रोजी पाहिले.[permanent dead link]