सिंदोळा किल्ला
सिंदोळा | |
नाव | सिंदोळा |
उंची | |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | पुणे, महाराष्ट्र |
जवळचे गाव | मढ,जुन्नर,पुणे |
डोंगररांग | मढनेर,माळशेज घाट |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | {{{स्थापना}}} |
भौगोलिक स्थान
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुका किल्ले आणि लेणींसाठी समृद्ध आहे. पुण्याच्या उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी, चावंड हडसर, निमगिरी, नारायणगड, जिवधन आणि सिंदोळा हे किल्ले आहेत.सिंदोळा किल्ला जुन्नरच्या वायव्येला आहे. मढनेर म्हणून ओळखला जाणाऱ्या खोप्यात असलेला सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे.
कसे जाल ?
अहमदनगर-कल्याण हा गाडीमार्ग माळशेज घाटामधून जातो. या गाडीमार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ कि.मी. अंतरावर खुजी फाटा आहे. या खुबी फाट्यावर जुन्नर कडूनही येता येते. खुबी फाट्यावर उतरून येथून उत्तरेकडील हरिश्चंद्रगडाकडे जाणारी वाट आहे.खुबी फाट्याच्या नैऋत्येला सिंदोळा किल्ला उढावलेला दिसतो.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पुर्वेकडे एक डोंगर धार गेलेली आहे. या डोंगर धारे मधे एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. अर्ध्या पाऊण तासात आपण या खिंडीमधे पोहोचतो. खिंडीतून पुढे न जाता डावीकडे डोंगरदांडावर चढणारी वाट पकडून डोंगर दांडावर यावे लागते. या दांडावर आल्यावर डावीकडे खोप्याच्या पलिकडे निमगिरीचा किल्ला दिसतो. समोर सिंदोळ्यामागे उधळ्या पर्वत दिसतो तर उत्तरेकडे टोलारखिंड आणि हरिश्चंद्रगड पसरलेला दिसतो. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येऊन पोहोचतो. आता माथ्याच्या वरून आलेली मोठी घळही दिसते. ही घळ उजवीकडे ठेवून तसेच आडवे चालत गेल्यावर आपण सिंदोळ्याच्या पश्चिम अंगाला येतो. पश्चिमेकडील घळीमधूनच गडावर जाणारा मार्ग आहे. वाटेमधे तुटलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांच्या मार्गाने चढताना उधळ्या डोंगर आपल्या पाठीमागे रहातो. दरवाजाचे नाममात्र अवशेष आणि तटबंदीचे थोडेसे अवशेष आपल्याला दिसतात.
गडाच्या माथ्यावरून हडसर, चावंड, शिवनेरी तसेच माळशेज घाटाखालील प्रदेश न्याहाळता येतो.
गडावरील राहायची सोय
नाही
गडावरील खाण्याची सोय
नाही
गडावरील पाण्याची सोय
गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारामहीने टिकत नाही. एक उघड्यावरचे मंदिर आहे. एका खडकातील खड्यामधे अनेक त्रिशुळ उभे केलेले दिसतात.
गडावर जाण्याच्या वाटा
Maalshej घाट मार्गे गेले तर होटेल माऊली पासून पायवाट आहे.गूगल थोडे पुढे घेउन जातो.
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ
2 तास चढने 1 तास उतरने
संदर्भ
- सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो
- डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
- दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर
- किल्ले - गो. नी. दांडेकर
- दुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
- ट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया
- सह्याद्री - स. आ. जोगळेकर
- दुर्गकथा - निनाद बेडेकर
- दुर्गवैभव - निनाद बेडेकर
- इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर
- महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर
- गडसंच - बाबासाहेब पुरंदरे
- किल्ले पाहू या - प्र. के. घाणेकर
- गडदर्शन - प्र. के. घाणेकर
- गड आणि कोट - प्र. के. घाणेकर
- इये महाराष्ट्र देशी - प्र. के. घाणेकर
- चला जरा भटकायला - प्र. के. घाणेकर
- साद सह्याद्रीची, भटकंती किल्ल्यांची - प्र. के. घाणेकर
- सोबत दुर्गांची - प्र. के. घाणेकर
- मैत्री सागरदुर्गांची - प्र. के. घाणेकर
- दुर्गांच्या देशात - प्र. के. घाणेकर
- गड किल्ले गती जयगाथा - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग १ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग २ - प्र. के. घाणेकर
- ओळख किल्ल्यांची - भाग ३ - प्र. के. घाणेकर
हे सुद्धा पहा
- भारतातील किल्ले