Jump to content

सिंगापूर डेमोक्रॅटिक पार्टी

सिंगापूर डेमोक्रॅटिक पार्टीच्या लोगोवर आधारित निदर्शनमात्र चित्र

सिंगापूर डेमोक्रॅटिक पार्टी (मराठी लघुरूप: सिंडेपा ; इंग्लिश: Singapore Democratic Part (लघुरूप: SDP) ; चिनी: 新加坡民主党 ; तमिळ: சிங்கப்பூர் மக்களாட்சி ; मलय: Parti Demokratik Singapura , पार्टी देमोक्रातिक सिंगापुरा ;) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील एक विरोधी राजकीय पक्ष आहे.

सिंडेपाची स्थापना इ.स. १९८० साली च्याम सी तोंग याने केली. इ.स. १९८४ सालातील सार्वत्रिक निवडणुकींमध्ये च्याम पोतोंग पासिर मतदारसंघातून जिंकून संसदेत जाणारा पहिला पक्षसदस्य ठरला. इ.स. १९९१ सालच्या निवडणुकींमध्ये च्याम यांच्यासह लिंग हौ तूंग व चेओ चाय चन हे अन्य दोन पक्षसदस्य संसदेवर निवडले गेले. मात्र इ.स. १९९३ साली पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीतून च्याम सी तोंग बाहेर पडला व त्याच्या जागी डॉ.ची सून चुअ‍ॅन याची सचिवपदी निवड करण्यात आली. इ.स. १९९७मधल्या निवडणुकींत लिंग व चेओ हे दोघेही जागा हरले, तर च्याम सी तोंगाने पक्षाचा राजीनामा देत सिंगापूर पीपल्स पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर सिंडेपाचा एकही सदस्य संसदीय निवडणुकींत जागा जिंकू शकला नाही.

सिंडेपा लिबरल इंटरनॅशनलआशियाई लिबरल व डेमोक्रॅट परिषद या राजकीय संघांचा सदस्य आहे.

बाह्य दुवे