Jump to content

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि. १९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.

निकष व अटी

महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[]

व्यक्तींसाठीचे निकष
  • सामाजिक क्षेत्रातील कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
  • पुरस्कार फक्त मातंग समाजातील व्यक्तीकरिता असेल.


संस्था
  • मांतग समाजाच्या कल्याणासाठी १० वर्षाहून अधिक काळ मौलिक कार्य केलेले असावे.

शिफारश पद्धती

या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[]

  • व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
  • विना दुराचार प्रमाणपत्र
  • गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
  • सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
  • संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल

लाभाचे स्वरूप

२५ व्यक्ती व ६ संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थांना प्रत्येकी ५०,००० रुपये, शाल व श्रीफळ तर प्रत्येक व्यक्तीस २५,००० रुपये, शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, खण व सपन्तिक गौरव. एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस टी बस प्रवास सवलत.

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ a b "सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार. | Social Justice & Special Assistance Department". sjsa.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.