Jump to content

सावा नदी

साव्हा नदी
बेलग्रेड शहराच्या मध्यातून वाहणारी साव्हा
सावा नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम क्रान्यास्का गोरा, स्लोव्हेनिया
मुखडॅन्यूब नदी
पाणलोट क्षेत्रामधील देशस्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
सर्बिया ध्वज सर्बिया
लांबी ९९० किमी (६२० मैल)
उगम स्थान उंची ८३३ मी (२,७३३ फूट)
सरासरी प्रवाह ९९० घन मी/से (३५,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ९७,७१३

साव्हा (सर्बो-क्रोएशियन: Sava) ही युरोपाच्या बाल्कन भागातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्लोव्हेनिया, ऑस्ट्रियाइटली देशांच्या सीमेजवळील क्रान्यास्का गोरा ह्या स्लोव्हेनियामधील एका गावामध्ये उगम पावते. तेथून साधारणपणे पूर्व दिशेस क्रोएशिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिनासर्बिया देशांमधून ९९० किमी अंतर वाहून साव्हा बेलग्रेड शहरामध्ये डॅन्यूब नदीला मिळते. साव्हा ही युरोपातील २१व्या क्रमांकाच्या लांबीची नदी व डॅन्यूबची सर्वात मोठी उपनदी आहे.

लियुब्लियाना, झाग्रेबबेलग्रेड ही तीन प्रमुख शहरे साव्हा नदीच्या काठांवर वसली आहेत.

बाह्य दुवे