सावरगाव
?सावरगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | तुळजापूर |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
सावरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
सावरगाव हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील छोटे गाव आहे. येथील ग्रामदेवता असेल्या नागनाथची यात्रा येथे नागपंचमीला भरते. नागपंचमी दरम्यान नाग, पाल व विंचू हे एकमेकाचे शत्रू तब्बल पाच दिवस नागठाण्यातील दगडाच्या सपित वास्तव्य करतात. निसर्गाचा हा अनोखा करिष्मा या यात्रेदरम्यान दरवर्षी पाहायला मिळतो. अवघ्या महाराष्ट्रातून भक्तांचा लोंढा सावरगावी धावतो. पाच दिवस विविध पारंपारिक कार्यक्रम तथा विधी पार पडतात. नागपंचमीदिवशी सायंकाळी ३ च्या सुमारास "खरग्या" व पालखी सोहळा संपूर्ण गावातून मिरवला जातो. पूर्वी कालिदास मामा लिंगफोडे,शंकरराव पाटील, बाबुराव पाटील ही मंडळी यात्रेची शोभा वाढवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे. आज राजकुमार पाटील, संतोष बोबडे, रामेश्वर तोडकरी तथा रमेश काटगावकर, प्रा.कानिफनाथ माळी आदी या संस्कृतीचा वारसा पुढे चालवत आहेत.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६२० मिलीमीटर असते.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
==नागरी सुविधा==जवळील गाव गंजेवाडी, सुरतगाव, जळकोटवाडी, वडगाव, केमवाडी, काटी, पागरवाडी, दहीवडी,