Jump to content

सावंतवाडी संस्थान

सावंतवाडी संस्थान
[[मराठा साम्राज्य|]] इ.स. १६२७इ.स. १९४७
ध्वजचिन्ह
राजधानीसावंतवाडी
सर्वात मोठे शहरसावंतवाडी
शासनप्रकारराजतंत्र
राष्ट्रप्रमुखपहिला राजा : खेमराजे सावंत
अंतिम राजा: शिवराम सावंत भोसले (इ.स. १९३७-४७)
अधिकृत भाषामराठी भाषा
लोकसंख्या250,589 (इ.स.१९३१)
–घनता104.6 प्रती चौरस किमी


सावंतवाडी संस्थान हे ब्रिटिश काळात मुंबई इलाख्यातील बेळगाव एजन्सीमधील एक संस्थान होते. या संस्थानाचे संस्थानिक खेम सावंत भोसले हे होते. आताचे सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ आणि उत्तर गोव्यातील काही गावे मिळून हे संस्थान बनले होते.[]

चतुःसीमा

सावंतवाडी संस्थानच्या प्रदेशाला लागून उत्तरेला व पश्चिमेला तत्कालीन रत्‍नागिरी जिल्हा म्हणजेच सध्याचा मालवण व कणकवली तालुक्यांचा काही भाग, दक्षिणेला गोवा, पूर्वेला कोल्हापूर संस्थान व बेळगाव जिल्हा होता.

स्वातंत्र्योत्तर काळ

भारत स्वतंत्र झाल्यावर हे संस्थान भारतात विलीन झाले. सावंतवाडी हा सध्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक तालुका आहे.

सावंतवाडी संस्थान हे लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध होते.

  1. ^ http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/146850/6/06_chapter%203.pdf