Jump to content

सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र शासन)



सार्वजनिक बांधकाम मंत्रालय
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्रभारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय सार्वजनिक बांधकाम मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळसार्वजनिक बांधकाम मंत्रालय
खाते

सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.

मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.[][]

कार्यालय

महाराष्ट्रचे सार्वजनिक बांधकाम मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Public Works (Including Public Undertakings) of Maharashtra
विद्यमान
एकनाथ शिंदे

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा सार्वजनिक बांधकाम मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडळ
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्तामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारीसुभाष देसाई प्रभारी
(२०२२ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारकमारोतराव कन्नमवार (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

अंतर्गत विभाग

  • सार्वजनिक बांधकाम विभाग
  • छत्रपती शिवाजी महाराज स्मारक
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि.

इतिहास

या विभागास सुमारे १५० वर्षांचा इतिहास आहे.या विभागाकडे मुख्यत: रस्याचे बांधकाम व देखरेख/सुचालन, पुलांची बांधणी व शासकीय ईमारती हे काम आहे. हे खाते महाराष्ट्र शासनासाठी तांत्रिक सल्लागार म्हणूनही काम करते. फार पूर्वी, पाटबंधारे, रस्ते व पुल तसेच सार्वजनिक ईमारतींचे बांधकामही या विभागाकडे होते.सन १९६० मध्ये जेंव्हा वेगळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, त्यानंतर या विभागाचे दोन विभागांमध्ये विभाजन करण्यात आले.पाटबंधारे विभाग आणि ईमारती व दळणवळण विभाग. सध्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग तसाच राहीला.[]


करण्यात येणारी कामे(थोडक्यात)

शासनाचे नेमून दिलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे करणे. शासकीय इमारतींचे बांधकाम, राज्यातील जनतेच्या सोयींसाठी रस्ते, पुल इत्यादिंचे निर्माण व त्यांचे सुचालन/देखरेख, वाहतूक निविघ्नपणे व सुरळीत रहावी या दृष्टीने बांधकामविषयक उपाययोजना, आकस्मिक आपत्ती जसे पूर, अतिवृष्टी, भूकंप इत्यादींमध्ये तातडीच्या उपाययोजना करणे.महाराष्ट्र शासन किंवा त्यांचे अखत्यारित असणाऱ्या कोणत्याही स्थानिक संस्थेने डिपॉझिट करून सोपविलेली कामे स्वीकारणे व पूर्ण करणे. रोजगार हमी योजने-अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम करणे.अति-महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिपॅडचे बांधकाम करणे. खाजगी ईमारती शासनाच्या कार्यालयांसाठी हव्या असल्यास त्याचा किराया/भाडे निर्धारीत करणे.हवाई वाहतूकीसंबंधी धावपट्ट्यांचे आरेखन, बांधकाम,सुचालन व दुरुस्ती करणे. महत्त्वाच्या सार्वजनिक ईमारतींचे बाजूस किंवा सभोवताल बाग-बगीचे तयार करणे लँडस्केपींग[मराठी शब्द सुचवा] तयार करणे.शासकीय विश्रामगृहांचे आरक्षण करणे.रस्त्यांचे कडेस असणाऱ्या फळझाडांच्या फळांचा लिलाव करणे.रस्याचे कडेस झालेले अतिक्रमण हटविणे. सिनेमा रेल्युलेशन ॲक्ट प्रमाणे सार्वजनिक वावराच्या ईमारतींना (चित्रपटगृह) आवश्यक ते स्थिरता प्रमाणपत्र व त्यांचे विद्युतीकरण तपासून आवश्यक ते प्रमाणपत्र देणे.उद्वहन(लिफ्ट)साठी प्रमाणपत्र देणे. आवश्यक ते अहवाल शासनास पाठविणे. शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांची,महाराष्ट्र राज्याचे अधिनियमंची अंमलबजावणी करणे.इत्यादी.[]

कार्यक्षेत्र

संपूर्ण महाराष्ट्र राज्य

कार्यक्षेत्राचे दृष्टीने विभाजन

प्रमुखत:, कामावर योग्य ते नियंत्रण रहावे म्हणून विकेंद्रीकरण व स्थानिक पातळीवर लक्ष देण्याचे अनुषंगाने व प्रशासकिय दृष्टीकोनातून याचे खालील विभाग करण्यात आलेले आहेत. या सर्व क्षेत्रांचे प्रमुख 'मुख्य अभियंता' हे असतात:

विभागीय मुख्यलये

  • साबां पुणे क्षेत्र, पुणे
  • साबां मुंबई क्षेत्र, मुंबई
  • साबां विशेष प्रकल्प,मुंबई
  • साबां नागपूर क्षेत्र, नागपूर
  • साबां नाशिक क्षेत्र, नाशिक
  • साबां औरंगाबाद क्षेत्र, औरंगाबाद
  • साबां अमरावती क्षेत्र, अमरावती
  • साबां राष्ट्रीय महामार्ग क्षेत्र, मुंबई
  • साबां विद्युत क्षेत्र, मुंबई
  • मुख्य अभियंता जलसंधारण विभाग (यंत्र)

या विभागातर्फे प्रकाशित पुस्तके

इंग्रजी:

  • BRIDGES IN MAHARASHTRA - प्रकाशन - १९९७


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

  • रस्त्याचे विविध प्रकल्प प्रस्तावित करणे त्यांचे चालन करणे.
  • विनिर्देशित रस्ते प्रकल्पांचे नियोजन, अन्वेक्षण/सर्वेक्षण,आरेखन, बांधकाम व व्यवस्थापन करणेव त्यांचे क्षेत्रांचा विकास
  • शासनातर्फे महामंडळास सोपविण्यात आलेल्या कोणत्याही बांधकामांच्या कामांबाबत किंवा इतर बाबतीत आवश्यक तो करार करणे
  • महामंडळाच्या सर्व कामांचे दृष्टीने निविदा, बोल्या व प्रगटने आमंत्रित करणे
  • वाहतूक प्रकल्प व त्यांचे क्षेत्राच्या विकासाबाबत, जसे नियोजन,अन्वेक्षण, आरेखन, बांधकाम किंवा व्यवस्थापनासाठी कोणत्याही व्यक्तिस, मंडळास किंवा कंपनीस, व्यक्तिगत संघटनेस कंपनीगत असेल किंवा नसेल तरीही, सहभागी करून घेण्याबाबत बढती देणे
  • ज्या कामांसाठी या महामंडळाची स्थापना झाली आहे अश्या कोणत्याही योजना अथवा कामे, एकतर इतर कॉर्पोरेट मंडळांशी अथवा संस्थांशी किंवा शासन अथवा स्थानिक प्रशासनाशी किंवा अभिकरण म्हणून स्वीकार करणे व त्यासंबंधी सर्व बाबींसह.‌
  • शासनाने प्रदत्त केलेली इतर कोणतेही प्रकल्प अथवा कामे स्वीकारणे[]

हे ही पहा

महाराष्ट्र शासनाचे विभाग

संदर्भ

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".
  3. ^ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल. दिनांक ०३/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळावर त्या खात्याबद्दलची माहिती. दिनांक ०२/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाबद्दलची माहिती. दिनांक ०२/०१/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)