Jump to content

सामान्यत: चुकीचे शब्दलेखन केलेले मराठी शब्द

विकिपीडियावर आणि वर्तमानपत्रांत अाढळणाऱ्या ढळढळीत चुका : उदा० येतो.

लेणे म्हणजे अलंकार, दागिना. हा नपुंसकलिंगी एकवचनी शब्द (नाम) आहे. शुद्धदलेखनाच्या जुन्या नियमांनुसारा 'णें'वर अनुस्वार होता.

गुहेतील दगडात कोरीव काम करून केलेल्या शिल्पाला किंवा तशाच कलाकृुतीला लेणे म्हणतात. हेही एकवचनी नाम आहे.

'लेणे'चे अनेकवचन 'लेणी' होते. पूर्वी हा शब्द 'णीं'वर अनुस्वार देऊन लिहीत.

'लेण्या-' हे लेणे या शब्दाचे एकवचनी प्रत्ययापूर्वीचे (किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी होणारे) सामान्य रूप आहे. उदा० १०व्या क्रमांकाच्या लेण्याचे वैशिष्ट्य; १०व्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये.

'लेण्यां-' हे लेणी या अनेकवचनी शब्दाचे एकवचनी किंवा बहुवचनी प्रत्यय लागण्यापूर्वी होणारे सामान्यरूप आहे. या शब्दांशात 'ण्यां'वर अनुस्वार आहे.

लेणे हा धातूही आहे. अर्थ - परिधान करणे. या धातूची 'ल्याला-ली-ले' (उदा० श्रेया घोषाल यांनी गायलेले गीत -सूर आले शब्द ल्याले, माझ्या आर्जवी मनात मैत्र लाघवी जागले. - चित्रपट : सुंदर माझे घर. किंवा, हिरवा शालू, हिरवी चोळी, हिरवा चुडा मी ल्याले. लाजलाजून मी गोरी मोरी झाले गं. गोरी मोरी झाले. - चित्रपट : चंदनाची चोळी) आणि 'लेवू' एवढीच रूपे वापरात आहेत. (कोट पाटलूण लेवू या, मामाच्या गावाला जाऊ या !)