Jump to content

साबुदाण्याची खिचडी

साबुदाण्याची खिचडी

साबुदाण्याची खिचडी हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आषाढी-कार्तिकी एकादशांच्या दिवशी घरोघरी बनतो. ही खिचडी उपवासाच्या दिवशी हमखास खाल्ली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या देवळांमध्ये साबुदाण्याच्या खिचडीचाच प्रसाद असतो.साबुदाणा पांढऱ्या रंगाचे गोल छोटे कडक दाने असते. खिचडी करायची असेल तर साबुदाणा कमीतकमी ३ते४ तास भिजत ठेवतात. []उपवासाच्या दिवशी ही खिचडी खाल्ली जाते असा संकेत रूढ आहे.[][]

उपवास खिचडी

  • साहित्य-
  • साबुदाणा १०० ग्रॅम (रात्रभर भिजवून ठेवलेला, जास्त पाणी घालू नये.)
  • मध्यम बटाटा (सोलून आणि पातळ काप करून)
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट-५० ग्राम
  • हिरवी मिरची (बारीक चिरून)
  • दही १/२ कप/लिंबु
  • जिरे १ चहाचा चमचा (टीस्पून)
  • मीठ (चवीपुरते)
  • शेंगदाणा तेलचहाचे चमचे (टीस्पून)(शक्यतोवर गाईचे तुपच वापरावे)
  • कृती-
  1. भिजवलेल्या साबुदाण्यात कूट आणि नारळ, मीठ, साखर घालून ढवळून घ्यावे.
  2. तूप कढईमध्ये चांगले गरम झाल्यावर त्यात जिरे आणि हिरवी मिरची घालावी.
  3. बटाटा घालावा.
  4. आच कमी करून आणि झाकण ठेवून बटाटा गुलाबी होईपर्यंत परतावा.
  5. त्यात भिजवलेलया साबुदाण्याचे मिश्रण घालावे आणि परतावे.
  6. वाफ येईपर्यंत चांगले परतावे.
  7. लिंबाचे लोणचे/ताक अथवा गोड दह्याबरोबर ही खिचडी वाढावी.

खिचडीला एक वाफ देउन झाली की झाकण काढून टाकावे नाही तर खिचडी गिजगा होते.

साबुदाण्याचे उपवासाचे थालीपीठ ही करतात. त्यासाठी साबुदाण्यात शेंगदाणेचा कूट, हिरव्या किंवा लाल मिरच्या चवीप्रमाणे, मीठ, लिंबाचा रस, थोडी साखर,जीरे, कोथिंबीर हे सर्व अंदाजे घालून मळून घ्या, थोडे तेल किंवा तूप लावा. आता चौकोनी कापड अोला करा त्या वर मध्यम आकाराचे थालीपीठ थापून गरम तव्यावर खरपूस भाजून घ्या.

कृती २- उपवासाला चालणारी गोड खिचडी

कृती ३-उपवासाला न चालणारी खिचडी

या खिचडीत तेलाचा वापर करतात आणि फोडणी करताना मोहरी आणि हळद यांचा वापर करतात. बाकी सर्व कृती उपवासाच्या खिचडीप्रमाणे असते.[]

संदर्भ

  1. ^ Mehra, Namita Moolani (2014-12-04). Cooking with Indian Spicebox (इंग्रजी भाषेत). eBookIt.com. ISBN 978-981-09-3064-6.
  2. ^ BORKAR, GAURI; BORKAR, ASHISH (2014-11-01). STHULATELA KARA TATA. Mehta Publishing House. ISBN 978-81-8498-574-0.
  3. ^ Verma, Mona (2013-12-08). FASTING FOODS OF INDIA (इंग्रजी भाषेत). Leadstart Publishing Pvt Ltd. ISBN 978-93-81115-95-4.
  4. ^ Stone, Martha (2014-11-15). Indian Paleo Kitchen: Top 25 Paleo Indian Recipes (इंग्रजी भाषेत). Martha Stone.