Jump to content

साबरमती नदी

साबरमती नदी

साबरमती नदी भारताच्या गुजरात राज्यातून मुख्यत्वे वाहणारी नदी आहे.

एकूण ३७१ किमी लांबीच्या नदीचा उगम राजस्थान मधील अरवली पर्वतरांगेत आहे. अरवली रांगांच्या मेवाड टेकड्यांमध्ये साबर व हाथमती या नद्यांच्या संयुक्त प्रवाहानंतर तीला "साबरमती" असे म्हणले जाते. ही नदी राजस्थानगुजरात या राज्यांमधून वाहणारी नदी आहे. ही नदी उत्तर - दक्षिण वाहते. शेवटी खंबातच्या आखातास जाऊन मिळते.