Jump to content

सापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरक

सापेक्ष दारिद्र्य

सापेक्ष दारिद्र्य ही संकल्पना प्रामुख्याने इंग्लंड, अमेरिका, जपान, जर्मनी इ. श्रीमंत, प्रगत व विकसित देशात लोकांचे दारिद्र्य ठरवण्यासाठी वापरली जाते. म्हणजेच सापेक्ष दारिद्र्य हे श्रीमंत देशात आढळून येते.

सापेक्ष दारिद्र्य म्हणजे, देशातील लोकांची त्यांच्या उत्पन्नानुसार तुलना करून किंवा उत्पन्नानुसार लोकांचे गट पाडून सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांना, सापेक्ष दारिद्र्याखालील म्हणले जाते.

सापेक्ष दारिद्र्यातील व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे इ. सर्व या मूलभूत गरजा पूर्ण करता येतात. मात्र सापेक्ष दारिद्र्याखालील लोकांचे उत्पन्न, राहणीमान श्रीमंत लोकांपेक्षा कमी असते त्यामुळे ती व्यक्ती दारिद्र्याखालील समजली जाते.

उदा. 'अ' व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 25 लाख ₹, 'ब' व्यक्तीचे 20 लाख ₹, 'क' व्यक्तीचे 15 लाख ₹ आणि 'ड' व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 10 लाख ₹ आहे असे गृहीत धरल्यास यामध्ये सर्वात कमी उत्पन्न असणारा 'ड' व्यक्ती सापेक्ष दारिद्रयाखाली येतो. मात्र 'ड' व्यक्तीला आपल्या 10 लाख ₹ उत्पन्नातून मूलभूत गरजा कशा पूर्ण कराव्या? हा प्रश्न नसतो. मात्र त्याच्या पेक्षा श्रीमंत असणाऱ्या लोकांच्या राहणीमानापेक्षा त्याचे राहणीमान कमी असते त्यामुळे 'ड' व्यक्तीला सापेक्ष दारिद्र्याखालील म्हणले जाते.


******************************************

निरपेक्ष दारिद्र्य :-

भारत, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका इत्यादी विकसनशील, अविकसित व गरीब देशातील लोकांचे दारिद्र्य दाखवण्यासाठी निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना वापरली जाते म्हणजेच निरपेक्ष दारिद्र्य केवळ गरीब देशांमध्येच दिसून येते.

निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे, ज्यावेळेस व्यक्तीला आपले जीवन जगण्यासाठी आवश्यक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, औषधे इ. किमान मूलभूत गरजाही पूर्ण करण्याची क्षमता नसते त्यांना निरपेक्ष दारिद्रयाखालील किंवा पूर्ण दारिद्रयाखालील म्हणले जाते.

किंवा भारतात ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दररोज आहारात 2400 कॅलरी उष्मांकाची आणि शहरी भागात 2100 कॅलरी उष्मांकाची म्हणजेच हे उष्मांक देणारे अन्न आवश्यक असते. ज्या व्यक्तीकडे हे उष्मांक देणारे अन्न खरेदी करण्यासाठी आवश्यक उत्पन्न, किंवा आवश्यक कमीत कमी खर्च करू शकत नाही त्याला दारिद्रयाखालील किंवा निरपेक्ष दारिद्र्याखालील म्हणले जाते.[]

गरीब देशात वस्तू व सेवांच्या किंमती वाढत गेल्यास लोकांचे उत्पन्न मूलभूत गरजाही पूर्ण करण्यासाठी कमी पडत‌ जाते, यातून लोकांचे निरपेक्ष दारिद्र्य दारिद्र्य, व दारिद्रयाखालील लोकसंख्येचे प्रमाण वाढत जाते.

थोडक्यात

१)गरीब देशात निरपेक्ष दारिद्र्य तर श्रीमंत देशात सापेक्ष दारिद्र्य दिसून येते.

२) सापेक्ष दारिद्र्य लोकांच्या राहणीमानतील तुलनात्मक फरक दाखवते तर निरपेक्ष दारिद्र्यात व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजाही पूर्ण करण्याची क्षमता नसते.

  1. ^ अर्थशास्त्र. कुंदनलाल चांडक इंडस्ट्रियल इस्टेट घाट रोड, नागपूर.: गीतांजली प्रेस प्रायव्हेट लिमिटेड. २००६. pp. ७१.