Jump to content

सापमान्या

तिरंदाज / लांब मान्या पाणकावळा लांबी – ८५ -९७ से.मी. जलाशयांवर आढळतो. प्रमाण कमी स्थानिक पाण पक्षी याची चोच व मान लांब व चिंचोळी असते, याच्या मानेचा रंग पिंगा असून गळ्याकडे पांढरा असतो, इतर अंग काळ्या रंगाचा असून पाठीवर व पंखात पांढरे ठिपके व लांबट पट्टे असतात. पाण्यात पोहतांना मान वर काढतो तेंव्हा ती सापा सारखी दिसते म्हणून याला सर्प पक्षी असे म्हणतात विण – जून ते मार्च [स्थानिक परिस्थिती नुसार बदल] याला इंग्रजीत स्नेकबर्ड अथवा डार्टर असे म्हणतात. (शास्त्रीय नावः Anhinga melanogaster)