Jump to content

सान होजे प्रांत

सान होजे हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या मध्य भागात आहे. याच्या भोवती उत्तरेपासून अलाहुएला, हेरेदिया, लिमोन, कार्तागो आणि पुंतारेनास प्रांत आहेत. या प्रांताच्या पूर्वेस प्रशांत महासागर आहे. कोस्ता रिकाचा जवळजवळ सगळा प्रशांत किनारा या प्रांतात आहे.

प्रशासन

हा प्रांत वीस कांतोनमध्ये विभागलेला आहे. प्रांताचे प्रशासकीय केंद्र सान होजे येथे आहे. हे शहर देशाची राजधानी आहे.