साधु सुंदर सिंग
साधु सुंदर सिंग ( जन्म ३ सप्टेंबर , १८८९:पंजाब,लुधियाना ) हे एक भारतीय ख्रिस्ती मिशनरी होते. जे संभवत: १९२९ मधे हिमालयाच्या पायथ्याशी मरण पावले.
सुरुवातीचा काळ
सुंदर सिंग यांचा जन्म एका श्रीमंत शीख घरात झाला. त्यांच्या आई अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या व त्यांना नेहमी साधु संताच्या सहवासात राहण्यासाठी नेत असत. सुंदर सिंग यांना लुधियाना मधील एका ख्रिस्ती मिशनरी शाळेत भरती केले. सुंदर सिंग १४ वर्षांचे असताना त्यांच्या आई मरण पावल्या. त्यामुळे ते अतिशय निराश झाले व त्यांनी आपला सर्व राग ख्रिस्ती मिशनरींवर काढला. त्यांनी बायबलची पाने फाडून जाळली जे त्यांच्या मित्रांनी पाहिले.
ख्रिस्ती धर्माचा स्वीकार
बायबल फाडून जाळल्यानंतर काही दिवसांनी अतिशय बेचैन झाल्यामुळे सुंदर सिंग यांनी रेल्वे खाली आत्महत्या करण्याचे ठरविले. त्या रात्री त्यांनी थंड पाण्याने आंघोळ केली व म्हणले की, ईश्वराने मला दर्शन द्यावे अन्यथा मी आत्महत्या करीन. त्या रात्री प्रभु येशू ख्रिस्ता ने सुंदर सिंग यांना दर्शन दिले. त्याच वेळी त्यांनी जाऊन आपले वडील शेर सिंग यांना सांगितले की मी ख्रिस्ती होणार व ख्रिस्ताचे मिशनरी कार्य करणार. [१]
त्यांच्या वडिलांनी त्यांंना अधिकृतपणे नकार दिला आणि त्यांचा भाऊ राजेंद्र सिंगने त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकदा नव्हे तर अनेक वेळा विषबाधा झाली. त्या भागातील लोकांनी त्यांच्या घरात साप फेकले, परंतु जवळच्या ब्रिटिश ख्रिस्ती लोकांच्या मदतीने त्यांना वाचवण्यात आले. [२]
त्यांच्या सोळाव्या वाढदिवशी, त्यांनी हिमालयाच्या पायथ्याशी सिमला [३] येथील पॅरिश चर्चमध्ये सार्वजनिकपणे ख्रिस्ती म्हणून बाप्तिस्मा घेतला. या आधी ते सिमला जवळील सबथु येथील ख्रिश्चन मिशनरी होममध्ये राहून तेथील कुष्ठरोग्यांची सेवा करत होते.
- ^ https://en.wikipedia.org/wiki/Sadhu_Sundar_Singh
- ^ Parker, Mrs. Arthur (1920). Sadhu Sundar Singh: Called of God. London: Fleming H. Revell Company. pp. 28–29
- ^ https://www.ccel.org/ccel/singh