Jump to content

साधना कामत

प्रा. साधना कामत या एक मराठी लेखिका आहेत. त्या महाविद्यालयात मानसशास्त्र हा विषय शिकवत असल्याने त्यांच्या लिखाणाचा संदर्भ अनेकदा मानसशास्त्राशी असतो. कामत यांची मानसशास्त्रातील फेरफटका या नावाची लेखमाला दैनिक लोकसत्तामधून प्रकाशित होत होती.

पुस्तके

  • जन्माने गुन्हेगार (अनुवादित, मूळ इंगजी लेखक दिलीप डिसूझा)
  • मनाचे मनोगत
  • मानसशास्त्रीय मार्गदर्शन
  • लागेना थांग (कथासंग्रह)
  • विद्यासदनातील गमती जमती (ललित, आठवणी)
  • सिगमंड फ्रॉइड विचारदर्शन