सादिक खान
सादिक खान | |
जन्म | ८ ऑक्टोबर, १९७० |
---|
सादिक अमन खान (८ ऑक्टोबर, १९७०:टूटिंग, लंडन, युनायटेड किंग्डम - ) हे लंडनचे महापौर आहेत. हे २०१६ पासून या पदावर आहेत. या आधी ते २००५-१६ दरम्यान टूटिंगचे खासदार होते. हे लेबर पार्टीचे सदस्य आहे आणि स्वतःला सामाजिक लोकशाहीवादी म्हणवतात.
खान यांचा जन्म दक्षिण लंडन मधील टूटिंग येथे ब्रिटिश पाकिस्तानी झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ लंडनमधून कायद्याची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी मानवाधिकार समस्यांमध्ये तज्ज्ञ वकील म्हणून काम केले २००५ मध्ये ते लेबर पार्टीचे सदस्य झाले आणि २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत टूटिंगचे खासदार म्हणून निवडून आले. यापूर्वी ते १९९४-२००५ या काळात वँड्सवर्थ बरोचे नगरसेवक होते. २००३ चे इराकवरील आक्रमण आणि नवीन दहशतवादविरोधी कायद्यांसह मजूर पक्षाचे पंतप्रधान टोनी ब्लेर यांच्या अनेक धोरणांवर त्यांनी उघडपणे टीका केली. ब्लेरच्या उत्तराधिकारी गॉर्डन ब्राउनच्या मंत्रीमंडळात २००८मध्ये त्यांना पद देण्यात आले. ते काही काळासाठी परिवहन राज्यमंत्री होते. खान हे एड मिलिबँड यांचे प्रमुख सहयोगी आहेत. त्यांनी मिलिबँडच्या शॅडो कॅबिनेटमध्ये लंडनचे छाया मंत्री आणि इतर पदांवर काम केले होते.
लंडनचे महापौर
२०१६ंमध्ये सादिक खान ५७% मते मिळवून लंडनचे महापौर झाले. हे लंडनचे तिसरे महापौर आणि पहिले मुस्लिम महापौर आहेत. [१] [२] निवडणुकीच्या निकालांना विलंब झाल्यामुळे, त्यांनी अधिकृतपणे 9 मे रोजी पदभार स्वीकारला. [३]
खानने १९९४मध्ये सादिया अहमद यांच्याशी लग्न केले. सादिया सुद्धा खान प्रमाणे वकील आहेत. त्यांना दोन मुली आहेत, [४] [५] सादिक खान लिव्हरपूल एफसीचे समर्थक आहेत. [६]
संदर्भ
- ^ Homa Khaleeli (7 May 2016). "Sadiq Khan's victory won't end Islamophobia, but it offers hope". The Guardian. 4 February 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Hooper, Ryan; Hughes, David (7 May 2016). "Warm Welcome as Sadiq Khan is Sworn in as Mayor of London". Press Association. 2 June 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ "Sadiq Khan Vows To Be 'Mayor For All Londoners'". Sky News. 7 मे 2016. 9 मे 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 मे 2016 रोजी पाहिले.
But because of the processes involved, he won't be technically in office until just after midnight on Monday.
- ^ Eaton, George (11 March 2016). "The pugilist: Sadiq Khan's quest to become mayor of London". New Statesman. 12 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 March 2016 रोजी पाहिले.
His grandparents emigrated from India to Karachi, Pakistan following Partition; his parents emigrated from Pakistan to London shortly before his birth.
- ^ Crerar, Pippa; Edwardes, Charlotte (13 जुलै 2016). "Sadiq Khan says 'I'm like a stressed Victorian dad' in revealing interview about his family and religion". London Evening Standard. 14 जुलै 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Webber, Esther (7 May 2016). "FA Cup: London mayor: The Sadiq Khan story". BBC News. 4 March 2021 रोजी पाहिले.