सांता मरिया (रियो ग्रांदे दो सुल)
हा लेख ब्राझिलमधील शहर सांता मरिया याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता मरिया (निःसंदिग्धीकरण).
सांता मरिया हे ब्राझिलच्या रियो ग्रांदे दो सुल प्रांतातील शहर आहे. देशाच्या साधारण मध्यात असलेल्या या शहराची लोकसंख्या २००६ च्या अंदाजानुसार २,७०,०७३ इतकी होती.
सांता मरियामध्ये ब्राझिलच्या वायुसेनेचा मोठा तळ आहे. येथे सांता मरिया केन्द्रीय विद्यापीठ तसेच इतर खाजगी विद्यापीठे आणि महाविद्यालयो आहेत.