सांता बार्बरा प्रांत, होन्डुरास
हा लेख होन्डुरासचा प्रांत सांता बार्बरा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता बार्बरा (निःसंदिग्धीकरण).
सांता बार्बरा प्रांत हा होन्डुरासच्या अठरा प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या वायव्य भागात आहे. येथून महोगनी या अतिकठीण लाकडाची तसेच सीडर या वृक्षाच्या लाकडाची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे. महोगनी आता संरक्षित वनस्पती आहे.
२००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या ३,६८,२९८ इतकी होती. या प्रांताची राजधानी सांता बार्बरा येथे आहे.