सांतलपूर
सांतलपूर भारतातील गुजरात राज्याच्या पाटण जिल्ह्यातील छोटे शहर आहे.
संस्थान
हे शहर सांतलपूर संस्थानाची राजधानी होते. सांतलपूर संस्थानावर तुर्कांचा (उमायद खिलाफतीतील सरदार) अंमल असल्याची नोंद आहे. त्यानंतर जाडेजा राजपूत येथील राजे होते. त्यानंतर झाला कुटुंबातील पुरुष येथील राजे झाले. पैकी सांतल झालाला त्याचा मेव्हणा राधनपूरचा राजा लुणाजी वाघेलाने मारले व राज्य जिंकले. कच्छच्या राजा रा खेंगारने सांतलपूर आणि आसपासचा प्रदेश जिंकून घेतला. कालांतराने हे राज्य ब्रिटिशांच्या आधीन झाले व पालनपूर एजन्सीमध्ये शामील करण्यात आले. पालनपूर एजन्सी काही काळाने बनासकांठा एजन्सी झाली व बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग झाली. १९४७मध्ये सांतलपूर संस्थान इतर संस्थानांसह भारतात विलीन झाले.
इतिहास
या गावाला सांतल झाला या राजाचे नाव दिलेले आहे.
१९६०मध्ये गुजरात राज्याची रचना झाल्यावर सांतलपूर महेसाणा जिल्ह्यात होते व नंतर पाटण जिल्ह्यात गेले.