सांजभयाच्या साजणी (काव्यसंग्रह)
सांजभयाच्या साजणी हा मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा पाचवा काव्यसंग्रह होय. इ. स. २००६ मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
अर्पणपत्रिका
आपला प्राचीन काव्यधर्म नव्याने उजळून दाखविणाऱ्या एका(च) सांजभयाच्या साजणीस कवीने हा संग्रह अर्पण केलेला आहे.
परिचय
कवीच्या आत्मनिवेदनानुसारच 'अगदी सुरुवातीच्या अर्धकच्च्या (की अर्धपिकल्या) कवितांचा' या संग्रहात समावेश आहे. इतर सर्व काव्यसंग्रहांच्या तुलनेत या संग्रहातील कविता सुगम वाटतात.