Jump to content

सांचिन संस्थान

सांचिन (इ.स.१७९१ ते इ.स. १९४७) हे जंजिऱ्याच्या सिद्दीच्या वंशजांनी, तत्कालीन पेशव्यांशी (सवाई माधवराव पेशवे? [ दुजोरा हवा]) तह करून गुजराथेत सुरतेजवळ सांचिन येथे स्थापन केलेले संस्थान होते. जंजिऱ्याचे सिद्दी हे अहमदनगर आणि विजापूर येथील राजाजवळ आरमाराच्या नोकरीत होते. हीच नोकरी त्यांनी मोंगलांच्या वेळीही केली. मोंगलांच्या ऱ्हासानंतर[ दुजोरा हवा] ते जंजिऱ्यास राहूं लागले. या सिद्दींनी मराठे व इंग्रज ह्यांच्याबरोबर अनेक उलाढाली केल्या.[]

जंजिऱ्याचा नवाब सिद्दी अब्दुल रहमान याचा मुलगा सिद्दी अब्दुल करीम हा सिद्दी जोहर याच्या बंडाळीमुळे/आक्रमणामुळे १७८४ मध्ये पळून पुण्याला पेशव्यांच्या आश्रयाला आला. त्याने १७९१ च्या पेशव्यांसोबतच्या तहात जंजिऱ्याचे अधिकार (केवळ कागदोपत्री ?) सोडून त्या एवजी सांचिनची जहागिरी मिळवली.[ दुजोरा हवा]

ब्रिटिश काळ

ब्रिटिश आमदानीत सांचिन हे सुरत पोलिटिकल एजन्सींतील संस्थान होते. ब्रिटिश सुरत जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ह्याचा विस्‍तार होता. संस्थानचे क्षेत्रफळ ४९ चौरस मैल व लोकसंख्या (१९२१) मध्ये १९,९७७ होती. कापूस व सुताचे कापड येथें तयार होत असे.

ह्या संस्थानात दोन फौजदारी कोर्टे असून एक तुरुंग आहे. १९०३-४ साली येथील उत्पन्न २ दोन लक्ष रुपयांवर झाले व खर्च दीड लक्ष रु. झाला. मेजर हिज हायनेस नबाब सिद्दी इब्राहिम महंमद याकुतखान हे ब्रिटिश आमदानीत साचिनच्या गादीवर होते . त्‍यांनां ११ तोफांची सलामी मिळत असे. सिदी मंहमद याकुत महमंदखान यांच्या कारकिर्दीत १९४७ मध्ये संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. []

त्या वंशातील रझाखान हे आता वकील आणि बांधकाम व्यावसायिक आहेत.[]

संदर्भ

  1. ^ केतकर, श्रीधर. सांचिन. ०९ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. पहिला परिच्छेद + आंतरजालावरून शोधलेली इतर माहिती More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ केतकर, श्रीधर. सांचिन. ०९ एप्रिल २०१४ रोजी पाहिले. पहिला परिच्छेद + आंतरजालावरून शोधलेली इतर माहिती More than one of author-name-list parameters specified (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ इकॉनॉमिक टाइम्स वृत्त ९ एप्रिल २०१४ रोजी जसे दिसले