सांगवी (फलटण)
हा लेख सातारा जिल्ह्यातील सांगवी गाव याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांगवी (निःसंदिग्धीकरण).
सांगवी, राजेकुरण हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एक गाव आहे. सांगवी गावाची लोकस॑ख्या जवळपास २५०० च्या आसपास आहे. गाव नीरा नदीच्या काठी वसलेले आहे.
सांगवी हे एक विभागलेले गाव आहे. त्यामध्ये सांगवी, सांगवी बंगला, राजेकुरण बंगला इत्यादी विभाग आहेत. राजेकुरण बंगल्यापासून जवळच रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांचे निवास स्थान आहे. इ.स. २०११ साली पोपट जाधव हे गावाचे सरपंच आहेत.