Jump to content

सांख्यदर्शनानुसार पुरूष बहुत्व

सांख्य दर्शनातील जो सांख्य शब्द आहे तो सम् +ख्या ह्या धातू पासून बनलेला आहे .हयाचा अर्थ "सम्यक विचार " असा आहे.

सांख्य दर्शनामध्येच पुरुष बहुत्व सांगितले आहे .पुरुष अनेक आहेत . जड प्रकूति शिवाय विश्वात चेतन पुरुषतत्त्वही असलेच पाहिजे अर्थात हे चेतनतत्त्व एकच असु शकत नाही सांख्यिनी पुरुष अनेक आहेत यावर विश्वास ठेवला आहे आणि पुरुषाची अनेकतासिद्ध करण्यासाठी खालीलकारिका दिली आहे -

जनन- मरण करणानां प्रतिनियमादयुगपत प्रवूत्तेश्च।

पुरूष बहुत्वं सिद्धं त्रैगुण्यविपर्ययाच्चैव ।।[]

1. जनन- मरण प्रतिनियमाद -

प्रत्येकाचा जन्म वेगवेगळ्या वेळी होतो.तसेच मरणही वेगवेगळ्या वेळी होते. म्हणजेच प्रत्येकाचा जन्म व मरण ही त्याला लाभले ली इंद्रिय सामुग्री त्याच्या पूर्व कर्मानी लाभत असते. सर्वच जीवांच्या ठायी जर एकच आत्मतत्त्व असते तर जन्म मरणाच्या बाबतीत भिन्नत्व राहीले नसते म्हणून पुरुष अनेक आहेत.

2. करणानां प्रतिनियमाद -

करण म्हणजे साधन. ज्ञान प्राप्त करण्यासाठी मानवाजवळ एकंदर तेरा इंद्रिय आहे आणि प्रत्येकात ही साधने जरी तेराच असली तरी सर्वाची मिळून तेरा मानता येत नाही कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव प्रत्येक वेळी वेगळा असतो . एकाला दुःख होत असताना दुसऱ्याला आनंद होत असतो .

3. अयुगपत् प्रवूत्ते-

प्रत्येक व्यक्तीची प्रवूत्ती व त्याला अनुसरून असणारी क्रिया भिन्न भिन्न असते जसे - एकाच वेळी कोणी जेवत असते, कोणी लिहीत असते . सर्व प्राणीमात्रांना एकाच वेळी भुक लागली असे होत  नाही .याचाच अर्थ प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्न भिन्न पुरुष आहे .

4.  त्रिगुण्यविपर्ययात् -

निरनिराळ्या व्यक्तीच्या ठिकाणी सत्त्व , रज , तम या तीन गुणांचे प्रमाण एकसारखे नसते . काही सत्त्व गुण प्रधान असतात काही रजो गुण प्रधान असतात .त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे गुण वेगवेगळे असतात .यावरून स्पष्ट होते की त्यांच्या करता भोग असतात ते पुरुष अनेक असले पाहिजे .

   अशा प्रकारे सांख्यानी पुरुष बहुत्व स्पष्ट केले आहे .

  1. ^ सांख्यकारिका.