Jump to content

सांख्यकारिका

षड्दर्शनातले सर्वात प्राचीन म्हणजे सांख्य दर्शन. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिलमुनी आहेत. या दर्शनातील प्रमुख सिद्धांतापैकी पुरूषबहुत्व हा महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे.

जन्ममरणकरणानां प्रतिनियमादयुगपत्प्रव्रृत्तेश्च।

पुरुषबहुत्वं सिद्धं त्रैगुण्यविपर्ययाच्चैव।।

सांख्यांचा पुरुष अजन्मा व नित्य आहे. मन, बुद्धी, अहंकार, इंद्रिये इ. सोबत एका नव्या देहाशी जिवाचा संबंध येणे म्हणजे जन्म व यासर्वांशी जिवाचा विच्छेद म्हणजे मरण.

1) जन्ममरणकरणानां - जगातल्या सर्व शरिरात एकच पुरूष असेल तर एकाचा जन्म होताच सर्वांचा जन्म व्हायला हवा , एकजण मरताच सर्वजणांचे मरण ओढवायला हवे. इंद्रियांबद्दल तसेच. पण व्यवहारात तसे दिसत नाही. म्हणून प्रत्येक शरिरात वेगला पुरुष मानावा लागेल.

2) अयुगपत् - युगपत् म्हणजे एकाच वेली व प्रवृृत्त्ति म

म्हणजे प्रयत्न . सर्व शरिरात एकच पुरुष असता तर सर्वांच्या क्रिया एकाच वेली झाल्या असत्या पण तसे होत नाही. एकजण स्नान करित असेल तर त्याचवेली दुसरा जेवत असेल. म्हणून पुरुष अनेक असतात हे सिद्ध होते.

3) त्रैगुण्यविपर्ययात - जगात वेगल्या स्वभावाचे लोक दिसतात. त्यांच्या स्वभावातला फरक तीन गुणांच्या न्यूनाधिक्यामुले असतो. एखादा सत्त्वगुणी असतो, आलशी व्यक्तिवर तमोगुणाचा प्रभाव असतो, तर लहान मुलांमध्ये रजोगुण अधिक असतो. म्हणून प्रत्येक देहात भिन्नभिन्न

पुरुष असतो हे सिद्ध होते.