Jump to content

सांकवाळ

सांकवाळ (Sancoale) हे गोव्यातील एक शहर आहे. येथे पूर्वी सारस्वत समाजाची लक्ष्मी-नृसिंह, शांतांदुर्गा शंखवलेश्वरी आणि विजयादुर्गा यांची मंदिरे होती. साधारण १५६० च्या सुमारास पोर्तुगीजांपासून वाचविण्यासाठी येथील मूर्ती वेलिंग आणि फोंडा येथे हलविण्यात आल्या.

भूगोल

सांकवाळची सरासरी उंची ४१ मीटर (१३५ फूट) आहे.

लोकसंख्या

२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, सांकवाळची लोकसंख्या २१,९२३ आहे. या लोकसंख्येपैकी ५३% पुरुष आणि ४७% महिला आहेत. सांकवाळचा साक्षरता दर सरासरी ८८.६१% आहे, हा दर गोवा राज्याच्या ८८.७०% या सरासरी दरापेक्षा कमी आहे. पुरुष साक्षरता दर ९१.५४% आणि महिला साक्षरता दर ८०.९३% आहे. सांकवाळ मधील १२.२८% लोकसंख्या ६ वर्षाखालच्या वयाची आहे. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Sancoale Population Census 2011". Government of India.