सह्याद्री एक्सप्रेस
सह्याद्री एक्स्प्रेस ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई व पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर ह्या शहरांना जोडणारी एक प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ह्या स्थानकांदरम्यान रोज धावते. महालक्ष्मी एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस ह्या दोन गाड्या देखील मुंबई ते कोल्हापूर दरम्यान रोज धावतात.
सह्याद्री एक्सप्रेस महालक्ष्मीच्या तुलनेत संथ गतीची असून तिला ५१९ किमी अंतर काटायला १२ तास १५ मिनिटे लागतात. छ.शि.ट. ते कोल्हापूरदरम्यान सह्याद्रीचे २६ थांबे आहेत. मुंबई-पुणे दरम्यानचा मार्ग विद्युत असल्यामुळे ह्या मार्गावर विजेचे इंजिन तर पुणे ते कोल्हापूर दरम्यान डिझेल इंजिन वापरून ह्या गाडीची वाहतूक केली जाते. ही ट्रेन कायमची बंद करण्यात आली आहे
थांबे
- छत्रपती शिवाजी टर्मिनस
- दादर रेल्वे स्थानक
- कल्याण रेल्वे स्थानक
- कर्जत रेल्वे स्थानक
- खंडाळा
- लोणावळा रेल्वे स्थानक
- तळेगाव रेल्वे स्थानक
- देहू रोड
- पिंपरी रेल्वे स्थानक
- खडकी रेल्वे स्थानक
- शिवाजीनगर रेल्वे स्थानक
- पुणे रेल्वे स्थानक
- जेजुरी
- नीरा
- लोणंद
- वाठार
- सातारा रेल्वे स्थानक
- कोरेगांव
- कराड रेल्वे स्थानक
- किर्लोस्करवाडी
- भिलवडी
- सांगली रेल्वे स्थानक
- मिरज रेल्वे स्थानक
- जयसिंगपूर
- हातकणंगले
- रूकडी
- वळिवडे
- कोल्हापूर