Jump to content

सहावा चामराज वोडेयार

सहावा चामराज वोडेयार
मैसुरुचा १०वा राजा
अधिकारकाळ१६१७-१६३७
अधिकारारोहण१६१७
राज्याभिषेक१६१७
राजधानीमैसुरु
पदव्यामहा मंडलेश्वर बिरुद-अंतेम्बरा-गंदा बेट्टाडा चामराज वोडेयार
जन्म२१ एप्रिल, १६०३
मृत्यू२ मे, १६३७
पूर्वाधिकारीपहिला राज वोडेयार
' दुसरा राज वोडेयार
उत्तराधिकारीदुसरा राज वोडेयार
वडीलयुवराज नरसराज वोडेयार
राजघराणेवडियार घराणे
धर्महिंदू

सहावा चामराजा वोडेयार (२१ एप्रिल, १६०३ - २ मे, १६३७) हा मैसुरुचा दहावा राजा होता. हा आपले आजोबा पहिल्या राज वोडेयारच्या मृत्यूनंतर सिंहासनावर आला.

विजयनगर साम्राज्याचा नाश

सहाव्या चामराजाच्या कारकीर्दीत विजयनगर साम्राज्याचा नायनाट झाला. बहमनी सल्तनतीसह इतर दख्खनी सल्तनतींनी राजधानी हंपीचा नाश करून साम्राज्याचे लचके तोडून घेतले. या धामधूमीत चामराजाने आपले राज्य झपाट्याने विस्तारले. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस त्याने आपल्या राज्याचा आकार जवळजवळ दुप्पट केला होता.

त्याच्या मृत्यूनंतर त्याचे काका,दुसरा राज वोडेयार सिंहासनावर बसले.