Jump to content

सहाण


ही एक प्रकारच्या वालुकाश्मापासुन बनविलेली वस्तु आहे.ही छोट्या पोळपाटासारखी दिसते. याचा पृष्ठभाग हा खरखरीत असतो. यावर सुकलेले चंदनाचे खोड हे पाणी टाकुन व थोडा दाब देउन वर्तुळाकार फिरवितात.त्यामुळे खोडाचे घर्षण होउन त्याचे अत्यंत सुक्ष्म कण पाण्यात मिसळल्यामुळे गंध तयार होते. चंदन हे गुणधर्माने शितल आहे. हे गंध देवास लाविले जाते. तसेच पूजा करणारा ते आपल्या कपाळास दोन भुवयांच्या मध्ये लावतो. त्याने मन शांत होते व पूजा करण्यास मन एकाग्र होते.[ संदर्भ हवा ]