सविता भावे
सविता रामकृष्ण भावे (जन्म : मळवली, १४ नोव्हेंबर१९३३; मृत्यू :१५ ऑक्टोबर २०१३) हे एक मराठी चरित्रलेखक होते. त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले. भावे यांनी तीसहून अधिक चरित्रे लिहिली.
मराठीतील अथश्री, उत्तररंग, प्रेरणा आणि योगक्षेम या वृद्धांसाठी असलेल्या मासिकांचे, त्रैमासिकांचे, षण्मासिकांचे, दिवाळी अंकांचे त्यांनी संपादन केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांची संघटना बांधण्यात मदत केली. त्यांच्या आत्मचरित्राचे नाव माणसांतला माणूस हे आहे.
साम्यवादी चळवळीत असलेल्या भावे यांनी नंतर सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य केले. पुण्यातील इंडियन लॉ सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटी यांच्याशी त्यांचा संबंध होता.
कौटुंबिक माहिती
भावे यांचा जन्म लोणावळ्याजवळच्या मळवली येथे झाला होता. शालेय शिक्षण पेणमध्ये, तर बी.ए.पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजात झाले. पुण्याच्या लॉ कॉलेजातून ते एल्एल.बी झाले. त्यानंतर त्यांनी लाइफ इन्श्युरन्स कॉर्पोरेशनमध्ये नोकरी केली. विनोबा भावे हे सविता भावेंचे काका होत.
चरित्रे
- अण्णासाहेब चिरमुले (??)
- अण्णासाहेब शिंदे (??)
- अनिरुद्ध कुलकर्णी : व्यक्ती आणि कार्य (संपादित, सहसंपादक - अनिल किणीकर, देवयानी अभ्यंकर, डाॅ. रवींद्र घवी)
- १३ आत्मकथने -डॉ.बानू कोयाजी, डॉ.शरच्चंद्र गोखले, बी.जी. देशमुख, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ.वसंत पटवर्धन, रोहिणी भाटे, डॉ.रघुनाथ माशेलकर, डॉ. प्र.चिं. शेजवलकर, शांता शेळके, डॉ.ह.वि. सरदेसाईं, जयंत साळगावकर, आदी (माझी प्रकाशवाट)
- आत्मचरित्र (माणसांतला माणूस)
- आबासाहेब अत्रे (शाळा एके शाळा)
- डॉ. नीलकंठ कल्याणी (२१व्या शतकाकडे - डॉ. नीळकंठ कल्याणी यांचे विचारधन)
- लक्ष्मणराव किर्लोस्कर (कथा किर्लोस्करवाडीची)
- शंतनुराव किर्लोस्कर (कालापुढची चार पाऊले)
- दादा गुजर (दादा आभाळाएवढा)
- डॉ.शरच्चंद्र गोखले (अवघेचि अलौकिक)
- डॉ.शरच्चंद्र गोखले (मांदियाळी)
- लोकमान्य टिळक (युगकर्ता)
- लोकमान्य टिळक, शेठ वालचंद हिराचंद, प्राचार्य ना.ग. नारळकर आणि आचार्य विनोबा भावे (चतुरंग पुरुषार्थ)
- डब्ल्यू आर ऊर्फ नाना तळवलकर (जेथे जातो तेथे)
- रामभाऊ तुपे (राहिले ते आपुले)
- जे.पी. नाईक (दूरदर्शी शिक्षणयोगी)
- ना.ग. नारळकर (नाना :एक शिल्पकार). हा सविता भावे यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ (नोव्हेंबर १९६७).
- कॉ. कडू पाटील (क्रांतिपंढरीचा वारकरी)
- ग.प्र. प्रधान (प्रधान मास्तर)
- श्रीकृष्ण महादेव बेहरे (निव्वळ जिद्दीतून)
- चंदन मेमन (आभाळा भिडले हात)
- व्ही.बी. राव (??)
- शेठ लालचंद (अधिनायक)
- वालचंद हिराचंद (वालचंद हिराचंद)
- वालचंद हिराचंद (वालचंद हिराचंद - जिंकिले भूमी, आकाश, जल (आत्मकथन)
- विनोबा भावे (दानयोगी विनोबा)
- हरिभाऊ साने (सन्मित्र)
अन्य पुस्तके
- अक्षरप्रीत (आत्मकथन)
- उत्साहपर्व (’उत्तररंग’ या षण्मासिकाच्या अंकांतील निवडक लेखांचा संग्रह)