सवाई माधोपूर
सवाई माधोपूर | |
भारतामधील शहर | |
रणथंबोर किल्ला | |
सवाई माधोपूर | |
देश | भारत |
राज्य | राजस्थान |
जिल्हा | सवाई माधोपूर जिल्हा |
स्थापना वर्ष | इ.स. १७६३ |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १,२१,१०६ |
- महानगर | १०,६४,२२२ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
सवाई माधोपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील सवाई माधोपूर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. सवाई माधोपूर राजधानी जयपूरच्या १८० किमी आग्नेयेस स्थित आहे. हे शहर जयपूरचे महाराजा सवाई माधोसिंग पहिले ह्यांनी १९ जानेवारी १७६३ रोजी स्थापन केले.
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान येथून केवळ ११ किमी अंतरावर असून ह्या उद्यानातील रणथंबोर किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. सवाई माधोपूर जंक्शन दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे.