सलायडा (कॉलोराडो)
हा लेख कॉलोराडोमधील शहर सलायडा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सलायडा, कॅलिफोर्निया.
सलायडा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. शेफी काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,२३६ होती.
या शहराची स्थापना १८८० साली झाली. त्यावेळी येथील रेल्वेस्थानक डेन्व्हर अँड रियो ग्रांदे वेस्टर्न रेलरोड या कंपनीचे मोठे केंद्र होते. रेल्वेवाहतूकीचे प्रमाण ओसरल्यावर सलायडा आता पर्यटनउद्योगावर चालते. मॉनार्क स्की रिसॉर्ट येथून जवळच आहे. याशिवाय कायाकिंग, व्हाइट वॉटर राफ्टिंग आणि पर्वतभ्रमणासाठीचे साहित्य विकणारी अनेक दुकाने येथे आहेत.