सर्वोदय दिवस
३० जानेवारी ह्या दिवसाला भारतात राष्ट्रपातळीवर 'सर्वोदय दिवस' म्हणून मानले जाते. १९४८ मध्ये ह्या दिवशी महात्मा गांधी ह्यांची हत्या झाली.
सर्वोदय दिवशी भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री तसेच तिन्ही दलप्रमुख दिल्लीतील राजघाट येथील महात्मा गांधीच्या समाधीस पुष्पांजली वाहतात. भारतीय हुतात्म्यांचा स्मरणार्थ देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटांची शांतता पाळली जाते. सहभाग्यांकडून प्रार्थना आणि समर्पणगीते म्हटली जातात.[ संदर्भ हवा ]