सर्वमित्र सिकरी
न्या. सर्वमित्र सिकरी (एप्रिल २६,१९०८- सप्टेंबर २४,१९९२) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे तेरावे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी आपल्या वकिलीची सुरुवात लाहोर उच्च न्यायालयामध्ये १९३० पासून केली. त्यांची इ.स. १९६४ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जानेवारी २२, इ.स. १९७१ ते एप्रिल २५, इ.स. १९७३ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. त्यांनी दिलेला केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार खटल्यातील निकाल भारताच्या संवैधानिक इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो.