Jump to content

सर्वदर्शनसंग्रह

सर्वदर्शनसंग्रह हा भारतीय तत्त्वज्ञानाचा परिचय करून देणारा संस्कृत भाषेतील महत्त्वाचा आणि मूलभूत ग्रंथ आहे. चौदाव्या शतकातील विद्वान तत्त्ववेत्ते पंडित माधवाचार्य यांनी तो रचला आहे. या ग्रंथात एकूण सोळा दर्शनांचा समावेश आहे. त्यात नास्तिक आणि जडवादी चार्वाक विचारसरणीचा तसेच अवैदिक बौद्ध आणि जैन दर्शनांचाही अंतर्भाव आहे. या ग्रंथाच्या मराठी भाषांतरामुळे मराठी साहित्यात आणि मराठी तत्त्वज्ञानविषयक साहित्यात मोलाची भर पडली आहे.

मराठी भाषांतर

या ग्रंथाचे मराठी भाषांतर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई यांनी प्रसिद्ध केले आहे. पंडित र.प. कंगले यांनी हे भाषांतर "श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)" या नावाने केले आहे. []"सर्वदर्शनसंग्रहाचे" भाषांतर म्हणजे तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर सामान्यजनांना एक मेजवानीच होय" असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र बारलिंगे यांनी व्यक्त केले आहे.[]

माधवाचार्य

माधवाचार्य हे विजयनगर साम्राज्याचे मंत्री असलेले प्रख्यात वेदभाष्यकार सायणाचार्य यांचे सुपुत्र होते. माधवाचार्य हे सुद्धा मंत्री असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. श्री. हरिहर, बुक्क यांनी स्थापन केलेल्या विजयनगरच्या सामाज्य्रात माधवाचार्य आणि सायणाचार्य हे दोन मंत्री होते, असे म्हणतात. "पंचदशी" कर्ते भारतीतीर्थ म्हणजेच विद्यारण्य असे समजले जाते. तसेच स्वामी विद्यारण्य म्हणजेच माधवाचार्य असाही एक समज आहे. हा समज खरा की खोटा हे मला माहित नाही," असे सुरेंद्र बारलिंगे नमूद करतात. []

सोळा दर्शने

  1. अर्हत म्हणजेच जैन दर्शन
  2. अक्षपाद दर्शन म्हणजेच नैयायिकदर्शनम्
  3. चार्वाक दर्शन
  4. जैमिनीय दर्शन
  5. नकुलीशपाशुपत दर्शन
  6. पाणिनीय दर्शन
  7. पातंजल म्हणजेच योगदर्शन
  8. पूर्णप्रज्ञ दर्शनम्
  9. प्रत्याभिज्ञा दर्शन
  10. बौद्ध दर्शन
  11. रसेश्वर दर्शन
  12. रामानुजदर्शनम्
  13. (वेदान्त दर्शन)
  14. वैशेषिक म्हणजेच औलूक्य दर्शन
  15. शैव दर्शन

बाह्यदुवे

संदर्भ

  1. ^ श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)", पंडित र.प. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, प्रथम आवृत्ती १९८५, किंमत रु.१२०/-
  2. ^ सुरेंद्र बारलिंगे, "निवेदन", श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)", पंडित र.प. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, प्रथम आवृत्ती १९८५, किंमत रु.१२०/-, २६ जानेवारी १९८५ प्रजासत्ताक दिन.
  3. ^ सुरेंद्र बारलिंगे, "निवेदन", श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी भाषांतर)", पंडित र.प. कंगले, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ, मुंबई, प्रथम आवृत्ती १९८५, किंमत रु.१२०/-, २६ जानेवारी १९८५ प्रजासत्ताक दिन.