सरवणा स्टोअर्स
सरवणा स्टोर्स(तमिळ:சரவணா ஸ்டோர்ஸ)हे चेन्नै स्थित डायव्हर्सीफाईड रिटेल(किरकोळ) विक्री करणारे मोठे दुकान आहे(मॉल). ह्या मेगास्टोर्स मध्ये किराणा,भुसार मालासोबतच ,दागिने,सौंदर्यप्रसाधने ,कपडे,प्लास्टिक प्रॉडक्ट्स,स्टीलची भांडी,गृहपयोगी सामान इ.वस्तु उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एकूणच एकाच छताखाली सर्वकाही संसारोपयोगी वस्तु मिळण्याचे भांडार अशी सरवणा स्टोर्सची ओळख आहे.त्यांच्या इतर ठिकाणीही शाखा आहेत.वस्तुव्यतिरिक्त खाद्यपदार्थांमध्ये आणि शीतपदार्थ जसे आइसक्रीम व्यवसायात देखील सरवणा स्टोर्स कार्यरत आहे. त्यांचे "जमै(Jamai)" हे आइसक्रीम अतिशय लोकप्रिय आहे. २००४ च्या आर्थिक वर्षानुसार सरवणाची आर्थिक उलाढाल २०० कोंटीपेक्षा अधिक होती.तसेच त्यांच्या आइसक्रीम व्यवसायात देखील तेवढीच उलाढाल होते.
संक्षिप्त माहिती
नाव = सरवणा स्टोर्स आणि टेक्साटाईल्स ,ज्वेलरी.
प्रकार = किरकोळ विक्री (विक्रिभांडार) शृंखला
वस्तुंचा प्रकार = गृहोपयोगी
स्थापना = ?
संस्थापक = सेल्वारत्नम
शहर = चेन्नै
देश = भारत
संकेतस्थळ = http://www.saravanastores.net/ Archived 2017-04-05 at the Wayback Machine.