सरला ठकराल
Indian aviator | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९१४ संयुक्त अरब अमिराती | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च १५, इ.स. २००८ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
| |||
सरला ठकराल (१९१४:नवी दिल्ली, भारत - १५ मार्च, २००८) ही विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होती.[१] १९३६ साली त्यांनी म्हणजेच २१व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले. पायलटचे लायसन्स मिळवल्यानंतर त्यांनी लाहोर फ्लाईंग क्लबमधून एक विमान खरेदी केले व त्या विमानामधून एक हजार तासाचे उड्डाण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 'ए' लायसन्स मिळाले.
१९३६ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा साडी नेसून विमान उडवले.त्यावेळी त्या चार वर्षाच्या मुलीच्या आई होत्या.
जीवन
सरला ह्या १६ वर्षाच्या असताना त्यांची पी. डी. शर्मा यांच्याशी ओळख झाली. त्या दोघांच्या विवाहानंतर शर्मांनी सरला यांना विमान चालक बनण्यासाठी प्रोत्साहित केले. पतीकडून प्रोत्साहन मिळाल्यामुळे सरला ठकराल यांनी जोधपूरमधील फ्लाईंग क्लबमध्ये अधिकचे ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली.
शर्मा यांची विमानोड्ढाणे कराची व लाहोर यांच्या दरम्यान होत असत. दुर्दैवाने 'कॅप्टन शर्मा यांचे १९३९मध्ये विमान अपघातात निधन झाले. ठकराल ह्या आर्य समाजाच्या होत्या. या समुदायात पुनर्विवाह करावयास अनुमती असल्याने त्यांनी १९४८ साली आर. पी. ठकराल यांच्याशी पुनर्विवाह केला. या विवाहानंतर त्या आपला दुसरा पती आणि दोन मुलींसह दिल्लीला रवाना झाल्या. पुढे त्या एक यशस्वी उद्योजक, चित्रकार बनल्या. त्यांनी कपडे व दागिने तयार करण्यास सुरुवात केली.
कारकीर्द
संदर्भ आणि नोंदी
- ^ "सरला ठकराल-भारत,women history". Women Of Aviation's History (इंग्रजी भाषेत). 2015-07-25. 2018-07-11 रोजी पाहिले.