Jump to content

सरमकुंडी

सरमकुंडी हे महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथे ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, कापूस यारखी पिके घेतली जातात.

सरमकुंडी गाव पेढ्यांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. खवा व पेढा घेण्यासाठी लोक सरमकुंडी फाट्यावर थांबतात. आसपासच्या गावात खवा तयार होतो आणि महाराष्ट्रातील विविध शहरात जातो.

सरमकुंडी पासूनच जवळच कुंथलगिरी हे जैन धर्मीयांचे तीर्थस्थळ आहे.

सरमकुंडी गावात दोन शाळा आहेत. जि.प.प्रा.शाळा सरमकुंडी व सरस्वती विद्यालय सरमकुंडी ह्या दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळा पहिली ते सातवी पर्यंत आहे. सरस्वती विद्यालय आठवी ते दहावी पर्यंत आहे.

गावात छोटा आठवडी बाजार भरतो. दर रविवारी लोक वाशी येथे तालुक्याच्या ठिकाणी बाजारासाठी जातात.