सरटोरियस
क्विंटस सरटोरियस(इ.स.पू. १२६ - इ.स.पू. ७२) हा रोमन सरसेनापती होता. याने इ.स.पू. ९७ साली स्पेनवर विजय मिळवून तो देश अंमलाखाली आणला. या कारणाने त्याचा नावलौकिक वाढला. अखेरच्या दिवसांत तो सुस्त व आळशी बनला आणि व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन त्याने अनेक क्रूर कृत्ये केली. परिणामी ज्युलियस सीझरप्रमाणेच त्याच्या मित्राकडून त्याचा वध झाला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर ज्याची तुलना केली जाते त्या सरटोरियसच्या अंगी असलेले शौर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये होते, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये एकही अवगुण नव्हता.[ संदर्भ हवा ]