सरकार (चित्रपट)
सरकार | |
---|---|
दिग्दर्शन | राम गोपाल वर्मा |
निर्मिती | राम गोपाल वर्मा |
प्रमुख कलाकार | अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन के के मेनन कत्रिना कैफ अनुपम खेर सुप्रिया पाठक तनिशा |
संकलन | निपुण गुप्ता |
संगीत | अमर मोहिले |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १ जून २००५ |
अवधी | १२३ मिनिटे |
सरकार हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. राम गोपाल वर्माचे दिग्दर्शन असलेला सरकार द गॉडफादर ह्या हॉलिवूड चित्रपटावरून प्रेरित आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व के के मेनन ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या सरकारमध्ये सुभाष नागरे नावाच्या मुंबईमधील एका बलाढ्य व लोकप्रिय व्यक्तीची व त्याच्या कुटुंबाची कथा रेखाटली आहे.
तिकीट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या सरकारचा दुसरा भाग सरकार राज २००८ साली प्रदर्शित करण्यात आला. सरकार प्रमाणेच सरकार राज देखील तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - अभिषेक बच्चन
- झी सिने पुरस्कार
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - अभिषेक बच्चन
- आय.आय.एफ.ए. पुरस्कार
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता - अभिषेक बच्चन
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील सरकार (चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)