Jump to content

सर परशुरामभाऊ महाविद्यालय

सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे
एस.पी. कॉलेज
सर परशुराम भाऊ महाविद्यालय पुणे
ब्रीदवाक्य निर्वाहः प्रतिपिन्न वस्तुषु
स्थापना १९१६
संकेतस्थळhttp://www.spcollegepune.ac.in



सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील एक प्रतिष्ठित स्वायत (2019-20 पासून) महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स. १९१६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने स्थापन केले आहे.

अध्ययन शाखा

  • कला
  • वाणिज्य
  • विज्ञान
  • संगणक शास्त्र
  • व्यापार प्रशिक्षण
  • कौशल्य विकास केंद्र

उपक्रम

  • राष्ट्रीय छात्र सेना
  • राष्ट्रीय सेवा योजना
  • वाग्नंमय मंडल
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळ
  • कला मंडळ
  • पुस्तक संघ
  • वादसभा:- विविध स्पर्धांमध्ये सहभाग व विविध स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजान वादसभेचे विद्यार्थी सदस्य करत असतात.
  • चित्रपट संघ
  • ऊर्मी कला आणि संस्कृती मंडळ
  • वाणिज्य मंडळ
  • विज्ञान मंडळ
  • साहसी क्रीडा विभाग

क्रीडा विभाग

  • खोखो
  • कब्बडी
  • हॉकी
  • बेसबॉल
  • दोगेबॉल
  • फुटबॉल
  • हॉलीबॉल
  • क्रिकेट

संस्थेचे बोधवाक्य

स.प. महाविद्यालयाचे बोधवाक्य आहे : निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु

हे वाक्य भर्तृहरीच्या नीतिशतकातून घेतले आहॆ. मूळ श्लोक असा :.

किं कूर्मस्य भरव्यथा न वपुषि क्ष्मां न क्षिपत्येष यत्

किं वा नास्ति परिश्रमो दिनपतेरास्ते न यन्निश्चलः |

किंत्वङ्गीकृतमुत्सृजन्कृपणवत् श्लाघ्यो जनो लज्जते

निर्वाहः प्रतिपन्नवस्तुषु सतामेतद्धि गोत्रव्रतम् ||

... भर्तृहरि नीतिशतक ११७.

अर्थ :- कूर्म हा पाठीवरून पृथ्वीचे ओझे ढकलून देत नाही म्हणजे काय ते त्याला जड वाटत नसेल? सूर्य कधीच थांबत नाही तर त्याला काय थकवा येत नसेल? एकदा सुरू केलेले काम क्षुद्रपणे मधेच सोडून द्यायला थोर लोकांना संकोच वाटतो. हाती घेतले ते तडीस नेणे हे थोरांचे कुलव्रतच असते.

महाविद्यालयातील सांस्कृतिक उपक्रम

कलामंडळ, मराठी संस्कृती मंडळ, परशुरामीय वार्षिक स्मरणिका संपादकीय मंडळ, सप्रेम सप असे अनेक उपक्रम संस्थेत चालतात. कलामंडळात वर्षभर अभिनयाची आवड असलेले विद्यार्थी अभिनयाचा सराव करतात. मराठी संस्कृती मंडळाचे विद्यार्थी महाविद्यालयात विविध प्रकारचे उत्तमोत्तम कार्यक्रम (उदा- अक्षरोत्सव) आयोजित करतात. वगैरे.