सय्यद सलीम
सय्यद सलीम हे तेलुगू लेखक आहेत. त्यांच्या कालुतुन्ना पुलाथोता या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. याशिवाय आंध्र प्रदेश सरकारचे अनेक मानाचे पुरस्कार सलीम यांना मिळाले आहेत. त्यांच्या कथांचे कन्नड, हिंदी, इंग्लिश, मराठी व उडिया भाषांतून अनुवाद झाले आहेत.
सय्यद सलीम नागपूर येथे आयकर विभागात संयुक्त आयकर आयुक्त या पदावर कार्यरत आहेत.
सय्यद सलीम यांची मराठीत भाषांतरित झालेली पुस्तके
- तलाक (कथासंग्रह)
- तीन बाजू (कथासंग्रह)
- राणीची गोष्ट (कादंबरी)
- सोनेरी मेघ (कादंबरी)