Jump to content

सयाजीनगरी एक्सप्रेस

भुज स्थानकावर उभी असलेली सयाजीनगरी एक्सप्रेस
सयाजीनगरी एक्सप्रेसचा मार्ग

सयाजीनगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या कच्छ जिल्ह्यामधील भुज शहरासोबत जोडते. ही गाडी वांद्रे टर्मिनस व भुज स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते भुज दरम्यानचे ८४१ किमी अंतर १६ तास व २५ मिनिटांत पूर्ण करते. कच्छ एक्सप्रेस ही गाडी देखील ह्या दोन स्थानकांदरम्यान रोज धावते.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा रेल्वेमार्ग विद्युत असल्यामुळे डब्ल्यू.ए.पी.-४ हे विद्युत इंजिन सयाजीनगरी एक्सप्रेसला अहमदाबादपर्यंत नेते व त्यापुढील प्रवास डिझेल इंजिन वापरून केला जातो.

तपशील

डबे

सयाजीनगरी एक्सप्रेसला १ प्रथमवर्गीय वातानुकुलित, २ वातानुकुलित २-टियर, ६ वातानुकुलित ३-टियर, ८ शयनयान, ३ अनारक्षित आणि २ ईओजी/सामानवाहतूक डबे असतात. प्रवाशांच्या मागणीनुसार यात किरकोळ बदल असतात.on demand.

इंजिन १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२
EOGURH1A1A2B1B2B3B4B5B6S8S7S6S5S4S3S2S1URUREOG

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१९११५वांद्रे टर्मिनस – भुज१४:५००९:२५रोज
१९११६भुज – वांद्रे टर्मिनस२२:१५५१४:०५रोज

मार्ग

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे