सम्मेद शिखर
श्री समेद शिखरजी हे झारखंड, भारतातील गिरिडीह जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे. हे झारखंड राज्यातील सर्वात उंच पर्वत पारसनाथ टेकडीवर आहे. हे सर्वात महत्त्वाचे जैन तीर्थ (तीर्थक्षेत्र) आहे, जिथे चोवीस जैन तीर्थंकरांपैकी वीस जणांनी मोक्षप्राप्ती केली असे मानले जाते.भारतात जैन धर्माची अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. सम्मेद शिखर हे पूर्व रेल्वेवरील पारसनाथ किवा गिरीडिह स्टेशनपासून अनुक्रमे चौदा व अठरा मैलावर आहे. पारसनाथ व गिरीडिह येथून शिखरजीला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत.
२४ पैकी २० तीर्थंकरांनी येथे निर्वाणा (मोक्ष) मिळवला आहे.
ते तीर्थंकर आहेत:
- श्री अजितनाथजी
- श्री संभवनाथजी
- श्री अभिनंदनजी
- श्री सुमतिनाथजी
- श्री पद्मप्रभूजी
- श्री सुपार्श्वनाथजी
- श्री चंद्रप्रभूजी
- श्री सुविधिनाथजी
- श्री शितलनाथजी
- श्री श्रेयांसनाथजी
- श्री विमलनाथजी
- श्री अनंतनाथजी
- श्री धर्मनाथजी
- श्री शांतीनाथजी
- श्री कुंथुनाथजी
- श्री अरहनाथजी
- श्री मल्लिनाथजी
- श्री मुनिसुव्रतजी
- श्री नेमिनाथजी
- श्री पार्श्वनाथ जी