Jump to content

समुद्रपक्षी

काळ्या डोक्याचा समुद्रपक्षी

समुद्रपक्षी हे इंग्रजीत सी-गल या नावाने ओळखले जातात. या पक्ष्यांचे जगातील सर्व खंडांमध्ये अस्तित्व आहे. पांढऱ्या शुभ्र अथवा राखाडी रंगाचे समुद्रपक्षी कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर गेल्यावर त्यांच्या कर्कश आवाजाने लक्ष वेधून घेतात. त्यांचे आवडते खाद्य मासे आहे. हे पक्षी मोठ्या अंतरापर्यंत उडून जाण्यात पटाईत असतात.