समुद्र राघू
समुद्र राघू किंवा लाल ढोक (शास्त्रीय नाव: फोनिकोप्टेरिडी फ्लेमिंगो; इंग्लिश: flamingo) हा एक पक्षी आहे आहे.
ओळख
आकाराने गिधाडापेक्षा मोठा.उंची अंदाजे चार फुट.लांब पाय.कुसुंबी धुवट रंगाची लांब मान.दिसायला ढोकासारखा.अगडबंब लाल चोच मध्यावर मोडल्यागत वाकलेली.नर-मादी दिसायला सारखेच.काळा काठ असलेल्या व गडद कुसुंबी पंखांच्या या पक्षिगणाचा आकाशात उडताना वळण घेत असतानाचा देखावा मनोहर दिसतो.
वितरण
निवासी आणि भटके.तसेच स्थलांतर करणारे.पाकिस्तान (सिंध),संपूर्ण भारत,नेपाळ तराई, बांगलादेश आणि श्रीलंकेतआढळतात.कच्छच्या रणात सप्टेंबर/ऑक्टोबर ते मार्च/एप्रिल या काळात वीण.
निवासस्थाने
दलदली,सरोवरे,चिखलाणी आणि खाड्या.
छोटा समुद्रराघू
इंग्रजीमध्ये lesser flamingo म्हणतात.मराठीमध्ये छोटा समुद्रराघू (पुरुष),बांडी (स्री)असे म्हणतात.हिंदीत छोटा राजहंस.गुजरातीत नानो बालो, नानो हंज.आणि तेलगुमध्ये चिन्नराजहंस असे म्हणतात.